नामदार मेघना बोर्डीकर गौरव चषक हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन
जिंतूर येथील छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळाचा उपक्रम, विजेत्यांना विविध पारितोषिके
जिंतूर/परभणी : जिंतूर येथील छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळाच्या वतीने ८ व ९ फेब्रुवारी रोजी नामदार मेघना बोर्डीकर-साकोरे गौरव चषक हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिंतूर येथीलजालना रोडवरील छत्रपती शाहू महाराज क्रीडांगणावर या स्पर्धा होणार आहेत.
आयोजक तथा माजी नगरसेवक चंद्रकांत बहिरट यांनी ही माहिती दिली. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर असतील. स्वागताध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, गोविंद थिटे, सहायक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल, तहसीलदार राजेश सरवदे, बुद्धिराज सुकाळे, जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे, नागेश देशमुख, इंजि जावकर,रमेश भराड, रमण तोष्णीवाल, विजय वाकळे, राहुल देशमुख, रमेश दरगड, गणेश कुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पारितोषक वितरणप्रसंगी बाजार समितीचे सभापती गंगाधरराव बोर्डीकर, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, वसंत शिंदे, डॉ.पंडित देशमुख, सुनील भोंबे, धरमचंद अच्छा, सुनील मते, प्रदीप चौधरी, सचिन तोष्णीवाल, गजानन वाघमारे, देवेंद्र भुरे, विलास भंडारे, विकास मोरे, फेरोज लाला, गुणीरत्न वाकोडे, शेख शकील, किशोर जाधव, संदीप लकडे, दत्तात्रय कटारे, सुमेध सूर्यवंशी आदींची उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राजेश जाधव, अविनाश बन, बाळू रानखांब, प्रदीप जाधव, अविनाश बन आदींनी केले आहे.