शिवजन्मोत्सवानिमित्त सेलूत विविध स्पर्धा

शिवजन्मोत्सवानिमित्त सेलूत विविध स्पर्धा

सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे आयोजन, विविध पारितोषिके 

सेलूू : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जन्मोत्सवानिमित्त येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने १८ व १९ फेब्रुवारी रोजी आंतरशालेय कबड्डी,  शिवमॅरेथॉन व सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कबड्डी स्पर्धा ५ वी ते ७ वी आणि  ८ वी ते ९ वी मुले- मुली अशा स्वतंत्र दोन गटात खेळवण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कबड्डी स्पर्धा नूतन विद्यालय इनडोअर क्रीडा हॉलमध्ये, तर सामान्यज्ञान स्पर्धा १६ फेबुवारी रोजी श्री के.बा.विद्यालयात होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना मोफत प्रवेश व कबड्डी खेळाचे संपूर्ण गणवेश संयोजन समितीच्या वतीने मोफत देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी विवीध समित्यांचे गठण करण्यात आले आहे.

स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन क्रीडा व वाचन संस्कृती चळवळ वृध्दींगत व बळकट करण्याच्या उपक्रमात कृतीशील योगदान द्यावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टे, उपाध्यक्ष दत्तात्रय सोळंके, सचिव रामेश्वर शेरे यांच्यासह भाऊराव घांडगें, नाना पवार, तान्हाजी भोसले, सर्जेराव लहाने, विलास खरात, आत्माराम हरकळ , वाल्मिक सोनवणे,  गणेश माळवे, प्रशांत नाईक, संजय भूमकर, राजेभाऊ चव्हाण, शरद मगर, सुभाष मोहकरे आदींनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!