नूतन कन्या प्रशालेत शुभेच्छा समारंभ उत्साहात

नूतन कन्या प्रशालेत शुभेच्छा समारंभ उत्साहात

परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे : प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी

सेलू : तुमचा अभ्यास झालेला आहे. तुम्ही गुणवंत आहात. नक्कीच यशस्वी व्हाल. त्यामुळे परीक्षेची कुठलीही भिती मनात न ठेवता विद्यार्थिनींनी दहावी, बारावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे प्रतिपादन नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी ४ फेब्रुवारीरोजी केले.

श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्चमाध्यमिक विभागातील बारावी वर्गातील विद्यार्थीनीच्या शुभेच्छा समारंभात प्राचार्य कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिक निशा पाटील होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या डॉ संजना बाहेती, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, भालचंद्र गांजापुरकर यांची उपस्थिती होती. ते म्हणाले की, ‘विद्यार्थीनींनी एकाग्रतेने अभ्यास करावा. अभ्यासक्रमातील प्रत्येक पाठ संकल्पना समजून घ्यावी. वेळेचे नियोजन करून अभ्यासासह नियमित पुस्तके, वर्तमानपत्र वाचावीत. भविष्याच्या दृष्टीने स्वतःला सक्षम बनवावे.

अभ्यासासह एक तरी छंद जोपासा : डॉ.संजना बाहेती

डॉ.संजना बाहेती म्हणाल्या की, ‘ विद्यार्थीनींनी शारीरिक, मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. केवळ गुणांसाठी नाही तर आयुष्याच्या लढाईसाठी तयार व्हावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यासासह आपला एक तरी छंद जोपासा.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकरावीच्या विद्यार्थीनींसह  विभाग प्रमुख प्रा.सपना काला, प्रा. स्नेहल दगडू, प्रा. रविंद्र कदम, प्रा. विजय धापसे, किशोर ढोके यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक डॉ.सुरेश हिवाळे केले. पाहुण्यांचा परिचय अंकिता आवटे हीने करून दिला. सूत्रसंचालन प्रतीक्षा ठोकरे , वैष्णवी मोगल हीने केले. तर दिव्या डंबाळे हीने आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!