सौ.सावित्रीबाई बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात
चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलू( जि.परभणी) : येथील सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन बुधवारी, ५ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरे झाले.
अध्यक्षस्थानी मकरंद दिग्रसकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ.एन.टी.कुंदनानी, दत्तराव पावडे, राजेशजी गुप्ता, संपतराव खरात यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापक सुखानंद बेंडसुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत सावरगावकर यांनी शालेय अहवाल सादर केला. पाहुण्यांचा परिचय उल्हास पांडे यांनी दिला. याप्रसंगी बालसभेतर्फे सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रम व नाट्यीकरणाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुणवत्ता पारितोषिक, कृष्णरूप सज्जा व विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार बालसभेच्या अनया ढाकणे, पृथ्वीराज इंगळे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच पालकांचे सहकार्य लाभले.