जिंतूरमध्ये तेरा वृत्तपत्र व्रिकेत्यांचा प्रत्येकी दहा लाखांचा काढला विमा

जिंतूरमध्ये तेरा वृत्तपत्र व्रिकेत्यांचा प्रत्येकी दहा लाखांचा काढला विमा

जिंतूर प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम, १४ पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

जिंतूरमध्ये तेरा वृत्तपत्र व्रिकेत्यांचा प्रत्येकी दहा लाखांचा काढला विमा

जिंतूर/परभणी : जिंतूर येथे प्रत्येकाच्या घरात वर्तमानपत्र पोचविणार्‍या १३ वृत्तपत्र व्रिकेत्या मुलांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून जिंतूर तालुका प्रेस क्लबचे संस्थापक आणि व्हाईस ऑफ मीडियाचे राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी सुंदरलाल सावजी बँकेचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर, तहसीलदार राजेश सरोदे, प्राचार्य डॉ. श्रीधर भोंबे, गटविकास अधिकारी सुभाष मानकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, प्रशांत राखे, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर आदींची उपस्थिती होती. जिंतूर शहरात वर्तमानपत्र वाटप करणार्‍या प्रभू सावरगावकर, शेख निषाद अहमद, गणपती आंबटवार, शिवाजी शिंदे, शेख इर्शाद अहमद, गणेश संगेकर, दीपक फाले, बंडू डावलबाजे, प्रकाश शिंदे, मेहबूब अहमद, इजाज अहमद, अक्षय काळे, गजानन संगेकर यांचा प्रत्येकी दहा लाख रुपयाचा विमा काढण्यात आला.

या वेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या १४ पाल्यांना वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये ओंकार शिंदे, नाहीद शेख, श्रद्धा फाले, प्रीती सावरगावकर, योगेश संगेकर, रेहान शेख, वैष्णवी फाले, आदित्य शिंदे, आशिया शेख, हुमेरा शेख, श्रावणी सावरगावकर, भक्ती फाले, शिवराज संगेकर, मारिया शेख यांचा समावेश आहे. या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. सूत्रसंचालन अ‍ॅड.मनोज सारडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष मंचक देशमुख, व्हॉइस ऑफ मीडिया अध्यक्ष भागवत चव्हाण, संदीप माहूरकर, प्रवीण मुळी, संतोष तायडे, शंकर जाधव, राम रेघाटे परमेश्‍वर ठोंबरे, दिलीप देवकर, राजाभाऊ काळे आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!