जिजामाता बाल विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

जिजामाता बाल विद्या मंदिर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने जिंकली मने 

सेलू : राजर्षि छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहरातील आंबेडकरनगर येथील जिजामाता बाल विद्या मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि संस्था वर्धापन दिन पाच फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरे झाला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेत जोगदंड होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक बजरंग गिल्डा उपस्थित होते. संस्था सचिव दिगंबरराव मुळे, डॉ.अभिलाषा जोगदंड, पद्माकर कुलकर्णी, मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक व वार्षिक अहवाल पाठक यांनी सादर केला. डी.व्ही.मुळे यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.

श्री.गिल्डा यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गोष्टी सांगून मार्गदर्शन केले. डॉ.अभिलाषा जोगदंड यांनी शुभेच्छापर भाषण केले. याप्रसंगी स्नेहसंमेलन यानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. कै.पंडितकाका देशपांडे (चारठाणकर) स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार इयत्ता चौथी व सातवी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना देऊन गौरविण्यात आले.

डॉ.अनिकेत जोगदंड यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना एका गीताद्वारे आपली किमंत कशी असावी, हे सांगितले. याप्रसंगी आंबेडकरनगर व परिसरातील पालक मोठया संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद मिळाली.

सूत्रसंचालन मंगेश शेळके आणि कृष्णकांत खापरखुंटीकर यांनी केले. भगवान पावडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयमाला काळे, विष्णू कटारे, सुनील राठोड, बाळू धनवे, तुकाराम अंभुरे यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!