रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प नीती आयोगाकडे सादर
सेलू/परभणी : सेलू येथील एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अटल टिंकरींग लॅबचा उत्कृष्ट उपयोग करत ” एलपीजी गॅस लिकेज शील्ड” या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची यशस्वी निर्मिती केली आहे. यामध्ये साहिल राठोड, व्हिजन खाडे आणि पुष्कर पुरी या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. हा प्रकल्प मंजुरीसाठी नीती आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील नऊ शाळांमधून १४ प्रकल्प नीती आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून, त्यामध्ये प्रिन्स इंग्लिश स्कूलचा समावेश आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर आदींनी अभिनंदन केले आहे.