आंतरशालेय कबड्डी स्पर्धेची सेलूमध्ये जय्यत तयारी
शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजन; ८० संघांनी केली नाव नोंदणी
सेलू : येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून स्पर्धेतील सहभागासाठी तालुक्यातील विविध शाळांच्या ८० संघांनी नाव नोंदणी केली आहे. ही माहिती शिवजन्मोसव समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टे व सचिव रामेश्वर शेरे, अप्पूसेठ सोळंके यांनी दिली.
१८ फेबुवारी रोजी नूतन विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लाल मातीची मैदाने तयार करण्यात येत आहेत. तसेच मुलींच्या कबड्डी स्पर्धा नूतन इनडोअर क्रीडा हॉलमध्ये घेण्यात येणार असून त्यासाठी प्रोकबड्डीप्रमाणे मॅटची मैदाने तयार करण्यात येत आहेत. ही मैदाने तयार करण्यासाठी तालुका क्रीडा संयोजक प्रशांत नाईक, राज्य सरचिटणीस गणेश माळवे, संजय भूमकर, राहूल घांडगे आदी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, प्रा.नागेश कान्हेकर, डी.डी.सोनेकर, राजेभाऊ चव्हाण यांनी दिली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या डासाळा, रवळगाव, वालूर, चिकलठाणा, देऊळगाव गात, सीपीएस कन्या सेलू अशा विविध केंद्रामधून व खाजगी व्यवस्थापनाच्या नूतन विद्यालय , नूतन कन्या, न्यू हायस्कूल, नितीन माध्यमिक, क्रांतिसिंह नाना पाटील, शारदा विद्यालय, विवेकानंद विद्यालय, के.बा.विद्यालय, यासेर उर्दू शाळा, यशवंत विद्यालय,पांडुरंग विद्यालय, शांताबाई नखाते विद्यालय, विद्यानिकेतन, ज्ञानतीर्थ विद्यालय अशा अनेक शाळांनी आपली नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभाग निश्चित केला आहे.