शाळांना ग्रंथ भेट देऊन वाढदिवस साजरा 

शाळांना ग्रंथ भेट देऊन वाढदिवस साजरा 

सेलू : सेलू येथील नूतन कन्या प्रशालेतील सेवा निवृत्त ग्रंथपाल डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता; त्या पैशातून सेलू येथील शारदा विद्यालय, यशवंत प्राथमिक शाळा व जि.प.प्राथमिक शाळा निपाणी टाकळी या शाळांना प्रत्येकी एकसष्ट ग्रंथाचा संच भेट दिला. या प्रसंगी मुख्याध्यापक भुते, लक्ष्मण शिंदे, सरपंच सुनील सावंत, हरकळ, अविनाश शिंदे उपस्थित होते. शारदा विद्यालयात मुख्याध्यापक डी.डी.शिंदे, साखरे भरत रोडगे, सुभाष मोहकरे, हिरे, सुनिता काळे, संगीता खराबे, यशवंत प्राथमिक शाळेत संस्थेचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, मुख्याध्यापक गोरे, थटवले वामन, कानडे, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. सर्वांनी शिंदे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!