आम्रवनमध्ये बौद्ध धम्म परिषद उत्साहात

आम्रवनमध्ये बौद्ध धम्म परिषद उत्साहात

सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील देवगाव फाटा येथील आम्रवन महाविहार येथे १४ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद नुकतीच उत्साहात पार पडली.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भदंत शरणानंद महाथेरो, भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत डॉ. ईदवंश महाथेरो, भदंत करूणानंद थेरो, भदंत पय्याबोधी, भदंत ग्यानरशीत थेरो, भदंत धम्मधर थेरो, भदंत पय्यानंद थेरो आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पालकमंत्री बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर घातला. समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, शिस्त, समता व बंधुता हे गुण अंगी असले पाहिजेत. धम्माच्या आचरणावर भर दिला पाहिजे तसेच भगवान बुद्धांच्या शिकवणीने समाजाचा खरा विकास होईल, असे बोर्डीकर यांनी या वेळी सांगितले. भदंत मुदितानंद थेरो, भदंत शीलरन्त थेरो, भदंत रेवतबोधी थेरो, भदंत पय्यारशीत, भदंम पय्यावंश, पोलिस निरीक्षक सुनील अंधारे, वसंत वाघमारे, नागनाथ साळेगावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. धम्म परिषदमध्ये उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!