विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत परभणी क्रिकेट संघाला विजेतेपद

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत परभणी क्रिकेट संघाला विजेतेपद

परभणी : जालना येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत परभणी पुरुष क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद प्राप्त केले आहे. परभणी संघाने बीड क्रिकेट संघाचा आठ गडी राखून पराभव केला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या नेतृत्वात संघाने लातूर, जालना या बलाढ्य संघांचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये बीड संघाचा दारुण पराभव केला. परभणी संघाकडून सांघिक खेळाचा अत्यंत अप्रतिम नमुना संपूर्ण सामन्यादरम्यान बघावयास मिळाला. उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, शिवाजी शिंदे, सामी, रामा कनले, दिनेश सरोदे, परळीकर आदींसह संघातील सर्वच खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्टपणे कामगिरी केली. सलामी फलंदाज सामी यांनी झंझावती अर्धशतक झळकावले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!