संत सेवालाल महाराज यांना अभिवादन
सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती (१५ फेब्रुवारी ) साजरी करण्यात आली. प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहशिक्षक गजानन साळवे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व सखोल माहिती दिली.व्यासपीठावर मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.