सामान्यज्ञान परीक्षेला सेलू्त मोठा प्रतिसाद
दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग, शिवजन्मोत्सवानिमित्त समितीचा उपक्रम
सेलू : येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवाजी राजांच्या जिवन चरित्रावर आधारीत रविवारी १६ फेब्रुवारीरोजी आयोजित तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व मिळाला.
येथील नूतन विद्यालय व केशवराज बाबासाहेब विद्यालयात ५ वी ते ६ वी, ७ वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी अशा तीन गटात आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या. परीक्षा यशस्वी करण्यासाठी केंद्र संचालक म्हणून विलास खरात, रामराव गायकवाड, किरण जाधव , तानाजी भोसले, रामराव बोबडे यांनी काम पाहिले. तालुक्यातील विविध शाळांमधील १०० शिक्षकांनी पर्यवेक्षक म्हणून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
स्पर्धा परीक्षा यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टे, उपाध्यक्ष अप्पूसेठ सोळंके, सचिव रामेश्वर शेरे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रोहीदास मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत देशमुख, आत्माराम हारकळ, सुरेश कवडे, गणेश माळवे, सुभाष मोहकरे, किरण खरात, नरेश पाटील, योगेश ढवारे , सर्जेराव सोळंके, रणजीत गायके, दतात्रय यादव, सिध्देश्वर मुरकुटे , बाबासाहेब काष्टे, मुकुंद सोळंके आदींनी परिश्रम घेतले. विजेत्या स्पर्धकांना १९ फेब्रुवारी शिवजयंतीदिनी रोख पारितोषिके , सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.