व्हाईस ऑफ मीडिया : सेलू तालुकाध्यक्षपदी शिवाजी आकात, मोहन बोराडे सचिव
नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड
सेलू : व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची २०२५-२६ या वर्षातील नूतन कार्यकारिणी निवडीसाठी रविवारी, १६ फेब्रुवारी रोजी तालुकाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी सभासदांची बैठक पार पडली. यामध्ये सेलू तालुकाध्यक्षपदी शिवाजी आकात यांची, तर सचिवपदी मोहन बोराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची व नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नूतन कार्यकारिणी या प्रमाणे : अध्यक्ष : शिवाजी आकात, सचिव : मोहन बोराडे, उपाध्यक्ष : पंकज सोनी, कार्याध्यक्ष : बाबासाहेब हेलसकर, कोषाध्यक्ष : संतोष कुलकर्णी, सहसचिव : बालाजी सोनवणे, संघटक : श्रीपाद कुलकर्णी, प्रसिध्दी प्रमुख : प्रताप काकडे, कार्यवाहक : शिवप्रसाद काबरा, मार्गदर्शक सदस्य : राम सोनवणे, नारायण पाटील, अशोक अंभोरे, जयचंद खोना, प्रसाद खारकर, डॉ.विलास मोरे, सचिन हिवरे, शंभू काकडे, लक्ष्मण सोन्ने