गळफास घेऊन शिक्षिकेची आत्महत्या
परभणी : सेलू येथील एका खासगी शाळेतील शिक्षिका रुपाली उर्फ सोनु रवी रोडगे ( वय ३२, रा.आदर्शनगर सेलू) यांनी राहते घरी बेडरुममध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रामेश्वर ज्ञानेश्वर पवार (रा.वझुर ता. पूर्णा जि.परभणी) यांनी दिलेल्या माहितीनुसार सेलू पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. सपोनि प्रभाकर कवाळे तपास करीत आहेत.