गटकळ अकॅडमीच्या भावना चौधरी यांची कर सहाय्यकपदी निवड
अकॅडमीच्या वतीने भव्य सत्कार
सेलू : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे घेण्यात आलेल्या ग्रुप – सी परीक्षांमध्ये गटकळ करिअर अकॅडमीच्या भावना कैलासचंद चौधरी यांची कर सहाय्यक व महसूल सहाय्यकपदी निवड झाली. याबद्दल अकॅडमी तर्फे सत्कार करण्यात आला. तिच्या या नियुक्तीमुळे सेलू तालुक्यातून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत असून गटकळ अकॅडमीच्या शरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
सेलू शहरातील मठगल्ली येथे राहणाऱ्या भावना कैलासचंद चौधरी यांनी सेलू येथील गटकळ अकॅडमी जॉईन करून योग्य मार्गदर्शन घेतले आणि घवघवीत यश संपादन केले आहे. या सत्कार सोहळा निमित्त अकॅडमीचे संचालक प्रा.रामेश्वर गटकळ, प्रा. दीपक गटकळ, दिलीप चोयल, मोहन चोयल, नयना चोयल , शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिद्द, चिकाटी, मेहनत व त्याचबरोबर सातत्य टिकून ठेवलं तर तुम्ही यशाला नक्कीच गवसणी घालू शकता असे मनोगत व्यक्त करताना भावना चौधरी यांनी सांगितले.