स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याखानमालेचे आयोजन
२० आणि २१ फेब्रुवारीला सायंकाळी व्याख्यानमाला
सेलू : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल आणि देवगिरी नागरी सहकारी बँक म. छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन सेलू शहरातील नूतन विद्यालयातील रा.ब.गिल्डा सभागृहात करण्यात आले आहे. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. व्याख्यानमालेचे हे १३ वे वर्ष आहे. २० फेब्रुवारी रोजी ” कुटूंब प्रबोधन – काळाची गरज” या विषयावर देवगिरी प्रांताचे कार्यवाह धनंजय केशव धामणे यांचे व्याख्यान आहे. अध्यक्ष म्हणून देवगिरी नागरी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर उपस्थित राहतील. २१ फेब्रुवारी रोजी “अहिल्यादेवींचे धर्मकार्य व राष्ट्रीय दृष्टीकोन” या विषयावर महाराष्ट्र व गोवा राज्य समरसता संयोजक नीलेश चंद्रकांत गद्रे यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य असणार आहेत. व्याख्यानमालेला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.