विजय चोरडिया यांना जैन समाजभूषण पुरस्कार

विजय चोरडिया यांना जैन समाजभूषण पुरस्कार

सकल जैन समाज सेवा संघातर्फे नांदेड येथे सन्मान

जिंतूर : जिंतूर येथील ज्येष्ठ पत्रकार विजय चोरडिया यांना सकल जैन समाजसेवा संघ नांदेडच्या वतीने जैन समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नांदेड येथे नुकताच प्रदान करण्यात आला. या वेळी जैन अल्पसंख्यांक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, सकल जैन समाज सेवा संघाचे अध्यक्ष आनंद जैन, सचिव ऋषिकेश कोंडेकर यांची उपस्थिती होती.

जैन समाजातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. विजय चोरडिया यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. रक्तदान शिबिरे, समाज प्रबोधनपर व्याख्याने, विविध ग्रंथालयांना तसेच गरीब होतकरू मुलांना पुस्तकांची भेट, वर्तमानपत्र वाटप करणार्‍या मुलांचा विमा, त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य, पत्रकारांना वेगवेगळी मदत, वृक्ष लागवड चळवळ, कॉपीमुक्त अभियान आदींसह वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या कार्याची दखल घेऊन चोरडिया यांना जैन समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास जैन समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुरस्काराबद्दल चोरडिया यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!