शिवजन्मोत्सव : सामान्यज्ञान स्पर्धेत नूतन विद्यालयाच्या अर्थव तोडकरचे घवघवीत यश
सेलू : सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती,सेलू आयोजित, शिवचरित्रावर आधारित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत सेलू तालुक्यातील जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत नूतन विद्यालयाचा विद्यार्थी अथर्व सुनील तोडकर (इयत्ता नववी) याने नववी ते बारावी या गटातून द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. संयोजन समितीच्या वतीने रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन अर्थव याचा यथोचित सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल अर्थवचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.