दिल्ली येथील साहित्य संमेलनात डॉ.सुरेश हिवाळे यांचा सहभाग

दिल्ली येथील साहित्य संमेलनात डॉ.सुरेश हिवाळे यांचा सहभाग

दिल्ली येथील साहित्य संमेलनात डॉ.सुरेश हिवाळे यांचा सहभाग

सेलू : येथील नूतन विद्यालयातील सहशिक्षक कवी डॉ. सुरेश हिवाळे यांचा ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यात सहभाग आहे. सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे २१, २२, २३ फेब्रुवारी रोजी होते आहे. या मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यात डॉ. सुरेश हिवाळे यांच्या ‘ भारतीय ‘ कवितेची निवड झाली असून सदर कविता ते रविवार ( दि. २३ ) रोजी संमेलनातील महात्मा ज्योतिराव फुले सभामंडपात सादर करणार आहेत. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सहभागा बद्दल डॉ.सुरेश हिवाळे यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!