सेलू लॉयन्स क्लबच्या आरोग्य शिबीराला मोठा प्रतिसाद

सेलू लॉयन्स क्लबच्या आरोग्य शिबीराला मोठा प्रतिसाद

३८० नेत्र व दंत रुग्णांची मोफत तपासणी, ६९ रुग्णांची करणार नेत्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया

सेलू : येथील लॉयन्स क्लबच्या वतीने रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३८० नेत्र व दंतरोग रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६९ रुग्णांची लॉयन्स नेत्रालय परतूर येथे अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशी माहिती या वेळी देण्यात आली.

सेलू येथील हुतात्मा स्मारक आयोजित शिबीराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक रामप्रसाद घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लॉयन्स क्लबचे रिजनल चेअर पर्सन लॉ.दिलीप मोदी, लॉ.संजय गुप्ता, लॉ.राजेश लुनिया, लॉ.मनोहर खालापुरे , डॉ.चव्हा, तालुकाध्यक्ष सुयश पटवारी, सचिव डॉ.बाळासाहेब जाधव, डॉ.शैलेश मालाणी, संजीवनी खालापुरे यांची उपस्थिती होती.

नेत्र तपासणीसाठी लॉयन्स नेत्रालयाचे तंत्रज्ञ अशोक पौळ, आकांक्षा केवारे, पुजा पाचारे , कवीता दुगाने, तर दंत तपासणीसाठी डॉ.विजय सावंगीकर, डॉ.कुंदन राऊत , डॉ.भाबट, डॉ.परेश बिनायके, ऋग्वेद लॅबचे गणेश आकात, महेश गोरे, प्रमोद हिंगे यांनी रुग्णांची तपासणी केली. प्रास्ताविक डॉ.बाळासाहेब जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर दतात्रय सोळंके यांनी आभार मानले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सहसचिव डॉ.अनुराग जोगदंड, डॉ.आशिष मेहता, डॉ. सुदर्शन मालाणी, डॉ.उमेश गायकवाड, डॉ. कैलास आवटे, अनुप गुप्ता, राजेंद्र सराफ, खुशाल तांगडे, कृष्णा काटे, विनोद शेरे, शंभू काकडे, जयसिंग शेळके, वैभव संघई, अजित सराफ, सागर लोया आदिंनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!