सेलूत २२४ परीक्षार्थींनी दिली श्रेया स्पर्धा परीक्षा
सेलू : आयएएस श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च या स्पर्धा परीक्षेचे आयोजन रविवारी शहरातील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेत करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेस प्राधान्य दिले आहे. पहिली व दुसरी वर्गासाठी ५० प्रश्नांची व १०० गुणांसाठी परीक्षा होती तर दुसरी ते सातवी वर्गांसाठी १५० प्रश्नांची व ३०० गुणांसाठी परीक्षा होती. इयत्ता पहिली ते सातवी वर्गातील २२४ परीक्षार्थींनी ही स्पर्धा परीक्षा दिल्याची माहिती जिल्हा समन्वयक शिवशंकर मोरे यांनी दिली. एक्झाम डे नाही, तर एन्जॉय डे वाटला, अशी प्रतिक्रिया पाटोदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रुद्रांश जोशी व सौरभ नजान या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी दिली.