सेलूत माकपचे २४ वे राज्य अधिवेशन गुरूवारपासून 

सेलूत माकपचे २४ वे राज्य अधिवेशन गुरूवारपासून 

तीन दिवस विविध सामाजिक, राजकीय प्रश्नांवर मंथन, जाहीर सभेचेही आयोजन 

सेलू जि.परभणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तीन दिवसीय २४ व्या राज्य अधिवेशनास गुरूवारपासून (२७ फेब्रुवारी) सुरूवात होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

२७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी सेलू् येथील साई नाट्यगृहात अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता होईल. उद्घाटक म्हणून माकप पॉलिट ब्यूरोचे केंद्रीय समन्वयक कॉम्रेड प्रकाश कारत (दिल्ली) उपस्थित असणार आहेत. विषेश अतिथी म्हणून माकप पॉलिट ब्यूरो सदस्य माजी खासदार कॉम्रेड निलोत्पल बसु (प.बंगाल), कॉम्रेड डॉ.अशोक ढवळे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष प्रा.भाई यू.आर.थोंबाळ असून अध्यक्षपदी पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड डॉ.उदय नारकर असतील. अधिवेशनात राज्यातील ३१ जिल्ह्यातील सुमारे ४५० निवडक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

अधिवेशनात राज्यातील सद्य राजकीय, सामाजिक परिस्थिती, धर्मांधता, जातीय विद्वेष, केंद्र व राज्य सरकारचे जनता विरोधी धोरण, तसेच दलित, आदिवासी, मुस्लिम, महिला शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, व्यापारी, छोटे उद्योजक यांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करून पुढील काळातील आंदोलनाची हाक देण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी कॉम्रेड रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तुसिंग ठाकूर, उद्धव पौळ, दिपक लिपणे, रामराजे महाडिक, नसीर शेख, अशोक बुरखुंडे, सुभाष शहाणे, इंदुमती महाडिक, राजू दक्ष यांच्यासह अनेक कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

जाहीर सभा 

यानिमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता लोकमान्य टिळक पुतळा परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख वक्ते म्हणून माकप पॉलिट ब्यूरोचे केंद्रीय, समन्वयक कॉम्रेड प्रकाश कारत असतील. या जाहीर सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन माकपच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!