जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी परभणी जिल्हा दौऱ्यावर

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी परभणी जिल्हा दौऱ्यावर

परभणी, दि.25 : जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी हे शुक्रवार, दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी परभणी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

दि. 27 फेब्रुवारी 2025 रात्री 9.00 वा. लोहा येथून परभणी येथे आगमन व सर्कीट हाऊस येथे मुक्काम. शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7.00 वा. नवागड उकळद येथील श्री नेमिनाथ जैन मंदिरास भेट, सकाळी 8.00 वा. परभणी शहरातील जैन मंदिरास भेट, दुपारी 12.30 वा. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ परभणी जिल्हा कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित भगवान महावीर जन्मकल्याणक निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभास ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वा. बोरी, जिंतूर येथील जैन मंदिरास भेट, सायंकाळी 5.30 वा. श्रीक्षेत्र नेमगिरी मंदिरास भेट, सायंकाळी 6.00 वा. सुंदरलाल सावजी बँकेस भेट. त्यानंतर वाहनाव्दारे ते हिंगोलीकडे प्रयाण करतील.

***

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!