हातनूरच्या कुस्त्यांच्या दंगलीत भगवान बाबर विजेते
सेलू : हातनूर येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची निमित्त शुक्रवारी, २८ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांची दंंगल पार पडली. यामध्ये भगवान बाबर या कुस्तीपटूने ११ हजार एकशे अकरा रूपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. दुसरे पारितोषिक ७ हजार ७७७ रूपयांचे संदीप कार्ले, तर तिसरे पारितोषिक ५ हजार ५५५ रूपयांचे राम़ मोरे या कुस्तीपटूने जिंकले. पहिले पारितोषिक नारायणराव निर्वळ यांच्याकडून, दुसरे पारितोषिक रमेश साखरे व सुभाष गाडे, तिसरे पारितोषिक दत्तराव रोकडे यांच्याकडून देण्यात आले.
पारितोषिक वितरणप्रसंगी मंदिर समितीचे एकनाथराव काकडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष म़ोतीराम रोकडे, माजी सैनिक रमेशराव काकडे, नारायण निर्वळ, दत्तराव रोकडे, रमेश साखरे, सरपंच महेंद्र गाडे, अनिल बेटकर, संपतराव काकडे, पोलीस पाटील रामचंद्र पारवे उपस्थित होते. पंच म्हणून बळीराम चव्हाण, बाबासाहेब डुकरे, अंकुश आंधळे, कृष्णा आंधळे, सुभाष सहजराव यांनी काम पाहिले.
कुस्तीस्पर्धा यशस्वीतेसाठी बाबा आबुज, सचिन रोकडे, भास्कर आंधळे,वैभव गाडे, नाथा खवने , गोविंद शिंदे, अंकुश आंधळे,रामा ठाकरे स्वप्नील काकडे, नवयुवक तरुण यांनी परीश्रम घेतले. बंदोबस्तीसाठी पोलिस कर्मचारी श्री बुधवंत, श्री.आघाव, श्री. राठोड, श्री.पारधी व पोलीस पाटील रामचंद्र पारवे आदींनी सहकार्य केले.