शाळांनी सातत्याने गुणवत्ता राखण्याचे आवाहन

शाळांनी सातत्याने गुणवत्ता राखण्याचे आवाहन

ललित गांधी यांचे प्रतिपादन; निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

परभणी : १००८ भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० निर्वाण वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २८) बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांनी उद्योगपती स्व. रतन टाटा यांचेही उदाहरण देत शाळांची गुणवत्ता सातत्याने राखण्याचे आवाहन गांधी यांनी  केले.

या स्पर्धेत खुशी मुथा, कल्याणी बोराळकर, करण गलबे, प्रगती इंगळे, दुर्गा मगर, मानसी बोराळकर, सात्विक मेहन्त्रे, अनुजा बोबडे, सुशांत तरवटे, हनुमान बुरसे यांचा सहभाग होता. स्वस्ती काला या विद्यार्थिनीचा कार्यक्रमात ललित गांधी, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच निरांत उदगीरकर याचांही सत्कार केला. मुलांचे

यावेळी गांधी म्हणाले, भगवान महावीरांचे अनेकांतवादाचे विचार सामाजिक, जागतिक शांततेसाठी महत्त्वपूर्ण असून आजही जगाला ते मार्गदर्शक ठरत आहेत. येथे राज्यातील १६ लाख विद्याथ्यर्थ्यांनी सहभाग घेतला, राज्यात सर्व समाजातील विद्याथ्यांसाठी जैन समूहाकडून शाळा चालविल्या जातात. तसेच जैन समाजातील विद्यार्थ्यांसह विकास व
त्यांच्या निवासी वसतिगृहासाठी योग्य तो निधी मिळवून देण्याचे आवाहन यावेळी केले. दरम्यान त्यांनी राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक विचार करून निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कार्यक्रमात मनोगतातून यावेळी दिले.उच्व शिक्षण पूर्ण करताना या बक्षिसाचा उपयोग व्हावा. पालकांवर शैक्षणिक खर्चाचा भार पडू
नये, यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती.

अल्पसंख्याक विकास योजनांचा आढावा
जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. तसेच या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जैन मंदिरांचे अध्यक्ष कांतिचंद गोलेच्छा, रुपेश साखला, राम मुथा, मंजुषा दर्डा, वीरकुमार सावजी, सर्व अध्यक्ष उपस्थित होते. जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे वसमत रोडवरील अल्पबचत निवास्थान येथील जिल्हा कार्यालयाचे उ‌द्घाटन गांधी यांनी केले. यावेळी मौ. आझाद आर्थिक विकास महामंडळ व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी हजर होते.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!