मातृभाषेतील शिक्षणापासून ४० टक्के वंचित

मातृभाषेतील शिक्षणापासून ४० टक्के वंचित

‘युनेस्को’च्या अहवालातील निष्कर्ष

मातृभाषेतील शिक्षणापासून ४० टक्के वंचित

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (युनेस्को) ‘ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग’ (जीईएम) पथकाच्या अहवालानुसार, जागतिक लोकसंख्येच्या ४० टक्के लोकांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षणाची सुविधा नाही. विविध देशांमध्ये मातृभाषेच्या भूमिकेबद्दल समज वाढलेली असूनही, धोरणात्मक उपक्रम मर्यादित आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल २५व्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त संकलित करण्यात आला आहे. या निमित्ताने मातृभाषांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांचा गौरव करण्यात आला.

आज, जागतिक स्तरावर, ४० टक्के लोकांना ते ज्या भाषेत बोलतात आणि जी भाषा त्यांना समजते त्या भाषेत शिक्षण घेता येत नाही. काही कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, हा आकडा ९० टक्क्यांपर्यंत जातो. याचा परिणाम एक अब्जाहून अधिक विद्यार्थ्यांवर होत आहे – वरिष्ठ सदस्य, जीईएम पथक

ही आव्हाने
■ या प्रकरणातील काही आव्हानांमध्ये शिक्षकांची मातृभाषा वापरण्याची मर्यादित क्षमता, मातृभाषेत अभ्यास साहित्याची अनुपलब्धता आणि समुदायाचा प्रतिकार यांचा समावेश आहे
■ काही कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत जास्त आहे.
■ २५ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे.
■ सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रांनी बहुभाषिक शिक्षण धोरणे आणि पद्धती लागू करण्याची शिफारस पथकाने केली.

अडथळ्यांशी संघर्ष
‘स्थलांतर वाढत असल्याने आणि वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांसह वर्गखोल्या अधिक सामान्य होत असल्याने भाषिक विविधता जागतिक वास्तव बनत आहे. ३१ दशलक्षाहून अधिक विस्थापित तरुणांना शिक्षणात भाषेच्या अडथळ्यांशी संघर्ष करावा लागत आहे,’ असे ‘भाषा विषय बहुभाषिक शिक्षणावरील जागतिक मार्गदर्शन’ या शीर्षकाचा अहवाल तयार करणाऱ्या पथकाने म्हटले आहे.


credit-MaTa – photo AI

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!