सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

परभणी : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उ‌द्योजकता मार्गदर्शन केंद्र व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 मार्च, 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम, परभणी येथे आयोजीत केला आहे.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्‌द्योगधंदे उपलब्ध नसल्याकारणामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू सुशिक्षित बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यास राज्यातील विविध नामांकित मोठे उ‌द्योजक कंपन्या सहभाग नोंदविणार आहेत.

जिल्ह्यातील बारावी, आयटीआय, डीप्लोमा, पदवी, बी.ई. पॉलिटेक्नीक इत्यादी शैक्षणीक पात्रताधारक उमेदवारांसाठी अप्रैटिशिप, ट्रेनी, रिलेशनशिप मॅनेजर, विमा सल्लागार, ट्रेनी केंद्र मॅनेजर, बीजनेस डेव्हलमेंट मॅनजेर, अॅग्रीकल्चर ऑफीसर, सेल्स रिप्रेजेंटेटिव्ह इत्यादी पदांसाठी मुलाखती घेवून जागेवरच निवड करण्यात येणार आहे. या पदांसाठी किमान वेतन 12 ते 30 हजार असणार आहे.

महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित उमेदवारांनी नाव नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या (mahaswayam.gov.in) या वेबसाईटवर करावी नाव नोंदणीची सुविधा महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे.

महारोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष नाव नोंदणी करणेसाठी दि. 8 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता आपल्या शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम, परभणी येथे स्वखर्चाने सर्व उमेदवारांनी उपस्थित राहावे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सदर मेळाव्यास सहभाग नोंदवावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उ‌द्योजकता सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे दुरध्वनी क्र. (02452-220074) संपर्क साधावा.


Photo credit: freepik vector

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!