बालकांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते शुभारंभ
जिंतूर/परभणी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य लसीकरण मोहीम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. या परभणी जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री मेघना बोर्डीकर -साकोरे यांच्या हस्ते जिंतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात झाला.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, राज्य सरकार प्रत्येक बालकांचे आरोग्य व उज्ज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेनी पार पाडेल सर्वांनी मिळून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आयोजित विशेष तपासणी व मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम यशस्वी करुया व या माध्यमातून प्रत्येक बालकांना सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचे काम करुया.
या वेळी जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ.नागेश लखमावार यांनी मेंदूज्वर लसीकरण व राष्ट्रीय बाल स्वास्थ या कार्यक्रम विषयी माहिती दिली. भाजपचे अध्यक्ष गोविंद थिटे, वाघीकर गोपाळ रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.राहुल गिते, तहसीलदार राजेश सरवदे,डॉ. कल्याण कदम, डॉ.पांचाळ, डॉ. चोंघे, वैद्यकीय अधिक्षक रविकिरण चांडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी दिनेश बोराळकर, डॉ.प्रशांत बामणे, डॉ.गौतम, विनोद राठोड,अनिल सावंत, देशमुख, लांडगे, प्रधान, राठोड व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.