डॉ.जगदीश नाईक यांच्या ‘तुकायन’ चे रविवारी प्रकाशन

डॉ.जगदीश नाईक यांच्या ‘तुकायन’ चे रविवारी प्रकाशन

पद्मश्री डॉ.मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार प्रकाशन

डॉ.जगदीश नाईक यांच्या 'तुकायन' चे रविवारी प्रकाशन

परभणी : परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जगदिश हरिबाई ज्ञानोबाराव नाईक यांनी लिहिलेल्या ‘तुकायन’ तुका म्हणे : तुकोबांची आरईबीटी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिध्द अभिनेते तथा मानसोपचार तज्ज्ञ पद्मश्री डॉ.मोहन आगाशे यांच्या हस्ते रविवारी, ९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम आहे. अध्यक्षस्थान कवी प्रा.इंद्रजीत भालेराव भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ज्ञ तथा गाथा अभ्यासक डॉ.विकास बाहेकर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा.ज्ञानोबा नाईक, डॉ.रामेश्वर नाईक, डॉ. जगदिश नाईक यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!