गॅस सिलेंडरचा स्फोटात शेतकऱ्याचे १३ लाखांचे नुकसान

गॅस सिलेंडरचा स्फोटात शेतकऱ्याचे १३ लाखांचे नुकसान

सुदैवाने जिवितहानी टळली, आहेर बोरगाव येथे शॉर्टसर्किटमुळे झालेली दुर्घटना

गॅस सिलेंडरचा स्फोटात शेतकऱ्याचे  १३ लाखांचे नुकसान

सेलू : घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे बुधवारी, ५ मार्च रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.  या घटनेत कापूस, संसारपयोगी साहित्य, दागीने आणि  रोख रक्कम आगीत भस्मसात होऊन शेतकऱ्याचे अंदाजे १२ लाख ६३ हजार २०० रूपयाचे नूकसान झाले आहे. सुदैवाने सुदैवाने जिवितहानी टळली आहे.

या बाबत माहिती अशी की, आहेर बोरगाव येथील हरिभाऊ विठ्ठलराव लहाने यांच्या राहत्या घरात शार्टसर्किट होवून आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत घरातील गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने स्फोट झाला. यामध्ये ९० हजार  रूपये किंमतीचा ज्वारी, गहू, तूर शेतमाल,  ५ लाख ६० रूपये किंमतीचा ७५ क्विंटल कापूस, सोयाबीन विक्री करून ठेवलेली रोख रक्कम १ लाख ७५ हजार २०० रूपये, नेकलेस, गंठन,एकदानी,वेल झूंबर,अंगठी असे ३ लाख ३० हजार रूपये किंमतीचे एकूण ५ तोळे सोने आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे, असे एकूण १२ लाख ६३ हजार २०० रूपयाचे नूकसान झाले आहे.

घटनेचा पंचनामा तलाठी, ग्रामसेवक व गॅस एजन्सी प्रतिनिधी यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमूळे शेतकरी हरिभाऊ लहाने यांचा संसार उघड्यावर आला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!