आजी-आजोबा मेळावा उत्साहात
सेलूतील प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा उपक्रम
परभणी : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान अंतर्गत प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये १० मार्च रोजी आजी-आजोबा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्यांची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता निर्माण होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये आजी आजोबांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध कलाकृती सादर केल्या. या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.संजय रोडगे, मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.