‘माहेश्वरीं’ चा डुंडन कार्यक्रम उत्साहात

‘माहेश्वरीं’ चा डुंडन कार्यक्रम उत्साहात

सेलूतील श्री बालाजी मंदिरात होळीनिमित्त आयोजन

सेलू : येथील बालाजी मंदिरात माहेश्वरी समाजाच्या वतीने बालकांवर निर्भयता, आत्मविश्वास आदी संस्कार करण्याच्या उद्देशाने आयोजित पारंपरिक डुंडन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रतिवर्षा प्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळी निमित्त गुरुवार, १३ मार्चरोजी सायंकाळी सात वाजता अथर्व गौरव बिहाणी, अवदेश संकेत तोष्णीवाल, यक्षित विनय सोनी, अंश शैलेश मालाणी, नमन भवानीशंकर जोशी, क्रिशिव विजय सोमाणी, चिराग तेजस परताणी, प्रिशा शुभम काबरा, देविका राधाकिशन मिश्रा, तिशा रमणकुमार दोडिया, उर्जा बासुजी तोतला अशा एकूण अकरा बालकांचा समावेश होता‌. कार्यक्रमात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भविष्य पुराणातील कथेनुसार राजारघूच्या राज्यात डुंडा नावाच्या राक्षसीने निर्माण केलेल्या दहशतीमुळे राज्यातील लहानमुळे आजारी पडत असत. वशिष्ट ऋषींच्या सल्ल्याने लोकांनी अग्नी प्रज्वलीत करून जोरदार आवाजात वाद्य वाजवून खेळ खेळल्यामुळे राक्षसीणी पळून गेली त्यामुळे लहान मुलांच्या मनातील भिती घालवण्यासाठी आई, काका, आजोबा यांच्या मांडीवर लहान मुलांना बसवून त्याभोवती वाद्यवाजवून खेळ खेळल्यास लहान मुलांच्या मनातील भिती नष्ट होते अशी परंपरा आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानस भजनी मंडळी, राजस्थानी महिला मंडळ व बालाजी मंदिर ट्रस्टच्या सर्व पदाधिकारी व ट्रस्टींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समाज बांधवांची व महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!