विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सेलूमध्ये सन्मान

विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सेलूमध्ये सन्मान

गायकवाड मित्रमंडळासह विविध संस्थांचा पुढाकार

या कर्तबगार महिलांचा झाला सन्मान…शैक्षणिक : तनिष्का तेलभरे, सवस्ति काला, श्रेया आवचार, मुख्याध्यापिका निशा पाटील, सुनीता वेडे, सुनीता काळे, महिला पोलिसांच्या माता : ज्योती चौधरी, आशा उपाध्याय, मीरा सूर्यवंशी, नंदाबाई  हिवाळे, अनुसया लोंढे, सैनिकांची माता शिवानी मलवडे, पोलीस दल : भाग्यश्री पुरी, अस्मिता मोरे, आरती हिवाळे, साहित्यिक : संध्या फुलपगार, प्रियंका डंबाळे, गझलकार : आश्विनी विटेकर, राजकीय :  वनिता चाफेकर, निर्मला लिपणे, अर्चना इंद्रोके, ऊषा दोड, कला : मनाली मानमोडे, महिला संस्था : कल्पना दत्तात्रय हेलसकर, ललिता राजेंद्र गिल्डा, डॉ.अभिलाषा अनुराग जोगदंड, गृह उद्योगिनी : सुमेधा जाधव, चंदा मेहता, क्रीडा योगासन : अनुजा सुभेदार, कराटे : तेजस्विनी महाजन, भजनी मंडळ: श्री केशवराज बाबासाहेब महिला भजनी मंडळ, सामाजिक : मंजुषा कुलकर्णी, विशेष सन्मान : मीराताई संगेकर, प्रतिभा कान्हेकर, रेणुका अंबेकर, अलका धर्माधिकारी, मंगल जोगदंड, उज्वला लड्डा, सारिका हेडगे, सुरेखा जाधव, सुमन नाईकनवरे, मंजुषा जगदाळे, यशोदा सामाले, उषा कदम, अनुसया जाधव, उपजिल्हा रुग्णालय, चंद्रभागा खाटोकर, स्वप्नाली पवार, मुक्ता गुट्टे, रेणुका काटमकर, रविता चव्हाण,अश्विनी गोरमाळी, अन्नपूर्णा आढे, संगीता भिसे, डॉ.सुवर्णा नाईकनवरे, नगर परिषद कर्मचारी : राधाबाई लखन हिवाळे, अहिल्याबाई कांबळे, लक्ष्मी बहोत, शितल सोळंके

सेलू : सेलू येथील छत्रपती शिवाजीनगरात आस्था सेवाभावी संस्था, डॉ.अशोकराव जोगदंड चारिटेबलं ट्रस्ट, अधिराज मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सेलू आणि सुनील गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘सन्मान नारिशक्तीचा, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी कामगार ते अधिकारी आणि शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या ५१ महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षिका मंगल जोगदंड, उद्घाटक पाथरी येथील ऊसतोड कामगार नंदा हिवाळे, प्रमुख वक्त्या प्रा.संगीता अवचार,  पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी, मंडळ अधिकारी सारिका हेडगे, अभियंता श्रद्धा घोडके, स्त्री रोग तज्ज्ञ सुवर्णा नाईकनवरे, सरकारी अभियोगता रुपाली आमले, नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याद्यापिका निशा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्त्री ही आयुष्यभर सन्मानास पात्र : प्रा.संगीता अवचार

स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान केवळ महिला दिनापुरता न करता ती आयुष्यभर सन्मानास पात्र आहे, असे प्रतिपादन प्रा.संगीता अवचार यांनी यावेळी केले. “महिलांची बदलत्या समाजभानातील भूमिका” यावर प्रा.अवचार यांनी प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, आपली संस्कृती ही आपल्या मुलांना समजून सांगितली पाहिजे. मुले ही मोबाईलपासून परावृत्त झाली पाहिजेत. आपली मातृभाषा मुलांना अवगत होण्यासाठी, आपण स्त्री, आई म्हणून प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. आपला माणूस सुनील गायकवाड यांचे त्यांनी कौतुक केले व म्हणाल्या की, या धकाधकीच्या जीवनात कुणाकडेही दुसऱ्यासाठी वेळ नाही. पण, गायकवाड यांनी सतत मागील ५ वर्षापासून हा आदर्श उपक्रम राबवित आहेत. स्त्री शक्तीचा सन्मान करून एक आदर्श पायंडा त्यांनी निर्माण केला आहे.

यांनी घेतले परिश्रम…

प्रास्ताविक सुनील गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले, तर आभार शुकाचार्य शिंदे यांनी मानले. कार्याल्लेख कीर्ती राऊत यांनी मांडला, पाहुण्यांचा परिचय शिल्पा बरडे यांनी दिला. यादी वाचन श्याम मचाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.के.शिंदे, प्रशांतसिंग ठाकूर, विष्णू बागल, वसंत शेरे, अभिजीत गायकवाड, भगवान यादव, अंबादास इगवे, गोविंद पडघन, भाऊसाहेब घाडगे, मंगेश मगर, पु.ना.बारडकर, मनीष बोरगावकर, किशोर गजमल, मुकुंद डासाळकर, छाया पाचलेगावकर, कांचन हिवाळे, मोहिनी गायकवाड, अश्विनी गायकवाड, दिनेश कटारे, सदाशिव महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!