हुकूमशाहीला रोखण्यासाठी आंबेडकरवाद हाच मार्ग : डाॅ.प्रकाश मोगले

हुकूमशाहीला रोखण्यासाठी आंबेडकरवाद हाच मार्ग : डाॅ.प्रकाश मोगले

आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परभणी येथे सत्कार

परभणी : हुकूमशाहीकडे देश मार्गक्रमण करीत आहे. अशा वेळी सामान्याच्या सन्मानाची लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी आंबेडकरवाद हाच मार्ग होय, असे प्रतिपादन प्रख्यात समिक्षक डाॅ.प्रकाश मोगले यांनी केले. अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महात्मा फुले कालणी सभागृह येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी पुढे बोलतांना त्यांनी ग्रंथप्रेम ही आंबेडकरवादाची ओळख तर नीतिमत्ता हा पाया आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.डाॅ.किर्तीकुमार मोरे यांनी डाॅ.प्रकाश मोगले यांच्या साहित्यात सर्वंकष क्रांतीची बिजं आढळतात, अशा भावना व्यक्त केल्या. महिला तक्रार निवारण समिती अध्यक्षा अनिता सरोदे, सदस्य आशा खिल्लारे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रियंका ऊबाळे यांच्यासह धम्मभुषण कचरु गोडबोले, विधीज्ञ रवि गायकवाड, एल.आर.साबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी डाॅ.अदिनाथ इंगोले, माजी शिक्षण संचालक नंदन नागरे, डाॅ.प्रकाश डाके, डाॅ.भगवान धुतमल, डाॅ.भीमराव खाडे, प्रेमानंद बनसोडे, प्राचार्य डाॅ.विठ्ठल घुले, डाॅ.सुरेश हिवराळे, एम.एम.भरणे, दि.फ.लोंढे, रामचंद्र रोडे बाबा आदी मान्यवर ऊपस्थित होते. प्रास्ताविक यशवंत मकरंद तर भुमिका प्रा.डाॅ.सुरेश शेळके यांनी व्यक्त केली.

सूत्रसंचालन विश्वजित वाघमारे तर आभार संजय बगाटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी पंडीत, संजिव आढागळे, प्रमोद अंभोरे, दिलिप बनकर, संघपाल आढागळे, आनंद मकरंद, दुर्गानंद वाळवंटे, धम्मपाल काकडे, विधीज्ञ चंद्रशेखर नरवाडे, अनिल धुतमल, एम.एम.बरे, सिध्दांत सूर्यवंशी, आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!