बीटीएस परीक्षेत सय्यद अरमान याचे घवघवीत यश
श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाकडून अभिनंदन
सेलू : येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थी सय्यद अरमान सय्यद अली याने जानेवारी महिन्यात घेतलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेत (बीटीएस) घवघवीत यश संपादन केले आहे. त्याने १५० पैकी १२२ गुण मिळवून सेलू तालुक्यात प्रथम, तर राज्य गुणवत्ता यादीत ३१ वा क्रमांक पटकवला आहे. शाळेतील ३५ विद्यार्थ्यापैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रमुख योगेश ढवारे, अमीता जवळेकर, शुभांगी भाग्यवंत, धीरज दूधगोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुद्ध जोशी, सचिव महेश खारकर, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, बालासाहेब हळणे आदींनी सय्यद अरमान याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.