माजी आमदार सीताराम घनदाट भाजपामध्ये

माजी आमदार सीताराम घनदाट भाजपामध्ये

परभणी : गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट(मामा) यांनी मंगळवारी, १८ मार्च रोजी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर , प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर , प्रदेश सचिव किरण पाटील, राहुल लोणीकर, संतोष मुरकुटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांच्या भाजपा प्रवेशाने जिल्ह्यातील भाजपा पक्षाला मोठी बळकटी मिळणार आहे, असे बोलले जात आहे
कार्यकारणी सदस्य रामप्रभू मुंडे ,भाई ज्ञानोबा मुंडे, डॉ.सुभाष कदम, रामकिशन रौंदळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे, महानगर जिल्हा अध्यक्ष राजेश देशमुख, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नंदेश्वर आप्पा बलोरे ,तालुका अध्यक्ष प्रशांत फड, रुपेश शिंगारे ,नरहरी ढोणे, अनंतराव बनसोडे, संजय मोहिते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.माजी आमदार सीताराम घनदाट मामा यांच्या भाजपा प्रवेशाने जिल्ह्यातील भाजपा पक्षाला मोठी बळकटी मिळणार आहे, असे बोलले जात आहे.
Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!