सेलूतील हिंदी मराठी ग्रंथालयातील कार्यक्रमात विनोद शेंडगे यांचे मत,
सेलू : वाचन संस्कृतीच्या निकोप वाढीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत वाचन आनंद संस्कार केंद्राचे विनोद शेंडगे यांनी बुधवारी (एक जून) व्यक्त केले.
राज्यस्तरीय अग्रलेख वाचन स्पर्धेच्या जनजागृतीसाठी शेंडगे यांच्या परभणी-पुणे सायकल प्रवासाला बुधवारी सुरुवात झाली. सायंकाळी सेलू (जि.परभणी) येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात शेंडगे यांनी नागरिकांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी नितीन खाकरे होते. प्रदीप शिंदे, विलास शिंदे, सूर्यनारायण रासवे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. खाकरे म्हणाले, ” वाचन संस्कारासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. वृत्तपत्रांतील एखादे लिखाण मनावर अधिराज्य करते. कायम स्मरणात राहाते. व्हाटस्ॲपवरील लिखाण अथवा संदेशवहन मानवी मनावर खोलवर संस्कार करीत नाहीत.” प्रास्ताविक, सूत्रसंचालन ग्रंथपाल महादेव आगजाळ, तर सहयोगी ग्रंथपाल पंडित जगाडे यांनी आभार मानले. गंगाधर खेबाळे, अनिल रत्नपारखी, बाबासाहेब हेलसकर , युवराज माने, अशोक राऊत, पांडुरंग पाटणकर, आर.डी.बोराडे, सुयोग साळवे, सुनील गायकवाड, अनिल तौर, अशोक खताळ, भगवानराव भाले, ॲड. हर्षवर्धन सोनकांबळे, शेख अन्सार हातनुरकर, संपतराव पवार, रामचंद्र गजमल, जुलाह मोहंमद अनिस, पांडुरंग घाटे , तन्मय, प्रेयस माने आदींसह वाचक उपस्थित होते.