गॅसचा भडका; पाच जण जखमी

गॅसचा भडका; पाच जण जखमी

सेलू तालुक्यातील मालेटाकळी येथील घटना

सेलू/परभणी : बाहेरगावी गेल्यावर बंद घरातील गॅस लिकिज झाला होता. दरवाजा उघडून गॅस लावताना गॅसचा भडका उडाला. यात पाचजणांना इजा पोहोचली असून त्यांच्यावर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेलू तालुक्यातील मालेटाकळी येथे रविवारी (२३ मार्च) सकाळी साडेदहा वाजण्याचा सुमारास घडली. मालेटाकळी येथील अच्युतराव ताठे हे कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. दरम्यान, घरात गॅस लिकिज झाला होता. रविवारी सकाळी आल्यावर घराचा दरवाजा उघडून प्रवेश केला. गॅस लावताच एकच भडका झाला. यात मीना अच्युत ताठे, अच्युत ताठे, पूजा ताठे, शिवानी ताठे व सोबत डासाळा येथील आलेले पाहुणे बापूराव बागल यांना इजा झाली. गावातील एका खाजगी वाहनातून जखमींना सेलू उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणले. प्रथमोपचार करून या पाच जणांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात औषधोपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. जखमींमध्ये मीना ताठे यांना मोठी दुखापत झाली आहे. घटनेतील जखमींचा जबाब पोलिस जमादार ज्ञानेश्वर जानगर यांनी रूग्णालयात जाऊन घेतला असल्याची माहीती पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे.


फोटो स्रोत : इंटरनेट

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!