पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा
पुणे येथील कृषि महाविद्यालयात २५ मार्चपासून आयोजन
परभणी : पिंजरा मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञान किफायतशीर होण्यासाठी पिंजरे स्थापित केल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापूर्वी पूर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह माशांचे आरोग्य व्यवस्थापन शास्त्रोक्त पध्दतीने करणे अत्यंत आवश्यक असते, तसेच उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थापन देखिल महत्वाचे आहे. पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत सखोल मार्गदर्शन करण्याची वाव विचारात घेऊन मत्स्यव्यवसाय विभाग, पुणे यांचेकडून पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत सखोल प्रशिक्षण कार्यशाळा दि. 25 ते 27 मार्च 2025 रोजी कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजीत करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये शास्त्रोक्त पिंजरा मत्स्यसंवर्धनाबाबत महत्वाचे बारकावे सखोल पध्दतीने समजावून घेण्याच्या दृष्टीने शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ञ अधिकारी व अनुभवी पिंजरासंवर्धक यांचे मार्फत सविस्तर मार्गदर्शन तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड व परभणी या 8 जिल्ह्यांमध्ये केज प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा अंतर्गत केज कल्चर योजनेतील सर्व पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारक तसेच पिंजरा मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी 9423758824, 9881600951, 8208413011 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी केले आहे.
फोटो स्रोत : इंटरनेट