युवक काँग्रेसच्या राज्य सचिवपदी इरफान जमीनदार यांची निवड
सेलू : अखिल भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी वालूर ता.सेलू येथील शेख इरफान अब्दुल रौफ जमीनदार यांची निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे विविध जिल्ह्यतील युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना संघटनमध्ये सहभागी करून युवक काँग्रेस पक्षातील राज्यस्तरावर निवड प्रकिया पार पाडली. ज्यात शेख इरफान जमीनदार याच्या नावाचा समावेश आहे. या निवडीबद्दल माजी आमदार सुरेशराव वरपुडकर, माजी आमदार सुरेशदादा देशमुख, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, मिलिंद सावंत, विनोद तरटे, नदीम इनामदार, अकबर जहागीरदार, अन्वर अली खान, शेख मोहसीन, शेख समीर, इमत्याज अली खान, मुश्ताक रब्बानी, डॉ.सोहेल खान, अजीम खान, मोबीन खान,आखेब खान आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.