संगीत तुलसी रामकथेसाठी हनुमानगढी सज्ज
सेलूत आज सायंकाळपासून कथा, रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या अमृतमय वाणीतून श्रवणाचा लाभ
प्रसिद्ध उद्योजक आर.बी.घोडके परिवारातर्फे भव्य आयोजन
सेलू / परभणी : रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांच्या अमृतमय रसाळ वाणीतून २५ मार्च ते ३० मार्च या कालावधीत सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत संगीत तुलसी रामकथेचे आयोजन सेलू (जि.परभणी) येथे करण्यात आलेले आहे. कथेसाठी नूतन विद्यालय परिसरातील हनुमानगढी सज्ज झाली आहे. सायंकाळी पाच वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून ते कथास्थळापर्यंत भव्य शोभायात्रा मिरवणूक निघणार आहे.
जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व गुरूवर्य श्रीसंत नथुरामबाबा केहाळकर यांची पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध उद्योजक तथा आरबी घोडके इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक रामप्रसादजी घोडके परिवारातर्फे या भव्य कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ३० मार्चरोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत रामकथा व वारकरी गौरव, संतपूजन कार्यक्रम आहे. दुपारी १ ते ४ महाप्रसादाने सांगता होणार आहे. सेलू येथील नूतन विद्यालय (हनुमान गढी) परिसरात कथा होणार असून कथामंडप उभारणीसह जय्यत तयारी सुरू आहे. कथा श्रवणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक रामप्रसादजी घोडके यांच्यासह भगवान घोडके, इंजि.अशोक घोडके, इंजि.अंबादास घोडके, डॉ.रविंद्र घोडके, राजेंद्र घोडके, देवराव काळे, डॉ.केदार खटींग, डॉ.कैलास आवटे, डॉ.शंकरराव काळे यांनी केले आहे.