लाचखोर क्रीडा अधिकाऱ्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
परभणी : एका क्रीडा स्पर्धेसह जलतरणिका बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करून १ लाख ५० हजार रूपये स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी आरोपी कविता नावंदे-निंबाळकर व क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी यांना शुक्रवारी, २८ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सन २०२४ मध्ये झालेल्या क्रीडा स्पर्धा आयोजनाचे ५ लाख रुपये आणि जलतरणिका बांधकामाचे ९० लाख रुपयांचे बिल जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या कार्यालयात प्रलंबित होते. या कामांचे बिले मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदाराकडून लाचेची दीड लाखांची रक्कम स्वीकारतांना नावंदे व बस्सी यांना गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने रंगेहाथ पकडले होते.
Image Courtesy : Internet