सामजिक ऐक्याचा संदेश देत रोज़ा इफ्तारचे आयोजन 

सामजिक ऐक्याचा संदेश देत रोज़ा इफ्तारचे आयोजन 

माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या उपस्थितीत आहेर बोरगाव येथील मस्जिदमध्ये कार्यक्रम

सामजिक ऐक्याचा संदेश देत रोज़ा इफ्तारचे आयोजन 

सेलू : रमजान हा मुस्लिम समाजासाठी पवित्र महिना असून या काळात उपवास (रोज़ा) धरले जातात आणि संध्याकाळी इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो. समाजामध्ये बंधूभाव आणि ऐक्य वाढेल या उद्देशाने माजी आमदार हरिभाऊ लहाने, सेलू नपचे माजी उपाध्यक्ष संदीप लहाने, आहेर बोरगावचे सरपंच अभय लहाने यांच्या वतीने गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून इफ्तार पार्टीचे आयोजन मस्जिदमध्ये करण्यात येते. या वर्षी शुक्रवारी, २८ मार्च रोजी सायंकाळी इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. गावातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते. सर्वानी मिळून एकत्र इफ्तार केला व सामाजिक एक्याचे दर्शन घडवले.

या वेळी शिवसेना (शिंदे )लोकसभा समन्व्यक माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त करत हिंदू मुस्लिम ऐक्याची गरज आणि त्याचे महत्व यावर भाष्य केले. धर्म हा जोडण्यासाठी असतो, तोडण्यासाठी नाही. सर्वानी स्लोखा आणि प्रेम असेच ठेवावे, असे स्पष्ट केले. आहेर बोरगाव हे एक ऐक्याचे प्रतीक आहे. सर्व लोक प्रेमाने वागतात. हा केवळ एक धार्मिक सोहळा नव्हता, तर बंधुत्व, ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचा प्रतीक होता.

रमजान हा त्याग, संयम आणि परस्पर प्रेमाचा महिना आहे आणि याच भावनेने समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. धर्म कोणताही असो, प्रेम आणि ऐक्यानेच समाज घडतो. पुढील काळातही अशीच बंधुता आणि सलोखा जपण्यासाठी कटिबद्ध राहूया. या इफ्तार पार्टीमध्ये शेख मुसाभाई, शेख इमाम भाई, शेख अल्लाउद्दीन, शेख खलील भाई, शेख नजमोद्दिन, शेख दगडू, शेख सिकंदर, शेख इब्राहिम शेख सलीम आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!