डॉ.संजय रोडगे यांचा प्रॉस्परस पब्लिक स्कूलतर्फे सत्कार
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलतर्फे शनिवारी, २९ मार्च रोजी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ डॉ.संजय रोडगे यांचा लोकमत ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल सत्कार केला. शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा मानाचा पुरस्कार हाँगकाँग येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. सकाळी डॉ. संजय रोडगे यांचे सेलू येथील प्रॉस्परस पब्लिक स्कूल येथे आगमन झाल्यानंतर, मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचा उत्साहात सत्कार केला. या सत्कार सोहळ्यास शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर व शिक्षकवृंद उपस्थित होते. डॉ. संजय रोडगे यांच्या या सन्मानामुळे संपूर्ण संस्थेच्या व शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.