पालकमंत्री बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजवाडीत वृक्षारोपण
परभणी : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी, १० एप्रिलरोजी राजवाडी (ता.सेलू) येथील स्मशानभूमीवर विविध जातीच्या ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी ॲड.रामेश्वर शेवाळे, शिवहरी शेवाळे, राजकिशोर मोदी, दत्तराव वायदंडे, आप्पासाहेब शेवाळे, बाबा काष्टे, कुंडलिक काष्टे, भास्कर शेवाळे, राजू वाव्हळे, मुख्याध्यापक विजय चिकटे, स्वाती हेलसकर, रेशमा सुकळकर, सुरेश कुलकर्णी, दिनकर शेवाळे, गणेश खरवडे, भगवान शेवाळे, विष्णू शेवाळे, चॉंदखॉं पठाण, इसाक पठाण, रामा काष्टे, अंगणवाडीताई, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.