पालकमंत्री बोर्डीकर यांच्या कार्यावर दिनदर्शिका 

पालकमंत्री बोर्डीकर यांच्या कार्यावर दिनदर्शिका 

सेवा संकल्प शिबीरात विमोचन, वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप, श्रीराम प्रतिष्ठानचा उपक्रम

सेलू : राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून बोर्डीकर यांच्या कार्यावर आधारित खास दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. याचे गुरुवारी विमोचन करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांसाठी ४००० वह्यांचे वाटपही करण्यात आले. या वेळी परभणी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

पालकमंत्री म्हणून मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांच्या या योगदानाची दखल घेत श्रीराम प्रतिष्ठानने त्यांच्या कार्यावर आधारित दिनदर्शिका प्रकाशित केली. यामध्ये त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. त्यांचा हा उत्साह आणि कार्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे डॉ.रोडगे यांनी यावेळी सांगितले.

शैक्षणिक साहित्य वाटपाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन

या सोहळ्यात गरजू विद्यार्थ्यांना ४००० वह्या वाटप करण्यात आल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला असून, शिक्षणक्षेत्रातील त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे डॉ. संजय रोडगे यांनी यावेळी नमूद केले.
ग्लोबल एक्सलन्स इन एज्युकेशन हा पुरस्कार डॉ.रोडगे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पालकमंत्री बोर्डीकर यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. डॉ.रोडगे यांनी शिक्षण क्षेत्रात एक नवा आयाम निर्माण केला आहे. त्यांचे हे यश परभणी जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, असे बोर्डीकर म्हणाल्या.

स्मार्ट अंगणवाडी संकल्प

या कार्यक्रमात पालकमंत्री बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला आणखी बळकटी देण्यासाठी एक महत्त्वाचा संकल्प जाहीर केला. डॉ.संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट अंगणवाडी स्वरूपात विकसित करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील लहान मुलांना आधुनिक सुविधांसह शिक्षण मिळणार असून, जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल. शिक्षणाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने विकास शक्य आहे आणि यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे बोर्डीकर यांनी ठामपणे सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!