सेलूत उद्यापासून पसायदान प्रवचनमाला
सेलू : येथील वसंत प्रतिष्ठानच्या वतीने श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांची पसायदानवरील तीन दिवसीय प्रवचनामालेला शनिवारपासून (१२ एप्रिल) सुरू होत आहे. प्रवचनमालेचे हे सहावे वर्ष आहे. १४ एप्रिलपर्यंत येथील श्री साईबाबा मंदिरात दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेआठ यावेळेत प्रवचन आहे. शहरातील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वसंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश खारकर व उमेश खारकर यांनी केले आहे.
०००