पालकमंत्री बोर्डीकर यांचा शालेय साहित्य भेट देऊन सत्कार
परभणी जिल्हा शिवसेना डॉक्टर सेलतर्फे शुभेच्छा कार्यक्रम
परभणी : आरोग्य राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा परभणी जिल्हा शिवसेना डॉक्टर सेलतर्फे गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठीचे शालेय साहित्य भेट देऊन सत्कार करण्यात आला. परभणी जिल्हा पदाधिकारी व कार्यकारणीतर्फे हे साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. आरोग्य विषयक समस्यांसाठी सदैव सहकार्य करेल, असे आश्वासन पालकमंत्री बोर्डीकर यांनी या वेळी दिले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (डेंटल विंग) डॉ.अनिकेत जोगदंड, डॉ परमेश्वर जाधव, डॉ.विश्वंभर देशमुख पेडगावकर, डॉ.अनुराग जोगदंड, डॉ. सचिन घनवट, डॉ.कपिल काळे, डॉ.श्रीनिवास गरुड, डॉ.नीरज चेचेडिया, डॉ.सुनील देशमुख, श्री.लबडे, संतोष पडुळे, सदाशिव बर्वे तसेच इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती