अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचे लोकार्पण

अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचे लोकार्पण

परभणीसह गंगाखेड, जिंतूर, सेलूच्या अग्निशमन ताफ्यात भर

परभणी : जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता आर्य पंप्स कंपनीने तयार करुन दिलेल्या मिनी रेक्यू टेंडर या अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मदत व पुनर्वसन विभाग यांचे मार्फत जिल्ह्यातील एकूण तीन नगरपालिका व एक महानगरपालिका अग्निशमन विभागास अत्याधुनिक सर्व साहित्यनियुक्त असलेले गुरखा वाहन फायर रेस्क्यू मिनी टेंडर शासनस्तरावरून प्राप्त झाले आहे. ही अग्निशमन वाहने अनुक्रमे गंगाखेड, सेलू, जिंतूर नगरपालिका अग्निशमन विभाग, परभणी शहर महानगरपालिका यांना उपलब्ध करून दिली आहेत. या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, अनुराधा ढालकरी, दत्तू शेवाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, नगरपालिका विभागाचे अग्निशमन अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचे लोकार्पण

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!